समृद्धी महामार्ग बांधकामाला शेतीची मोजमाप करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले…
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्ग बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत विरोध केला आणि यासंदर्भात शेकडो शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले होत व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन दिले आहे.लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरीत करण्यासाठी कार्यवाही सुरू केली मात्र या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीचे किंमत किती मिळणार हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नसल्याने शेतकरी संभ्रमित आहेत अश्या आशयाचे निवेदन दिले मात्र शेतकऱ्याच्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवत आज पुन्हा शेतकऱ्यांच्या शेतीचे मोजमाप करण्यासाठी कर्मचारी आले असते शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्मचारी व अधिकारी यांना परत पाठविले आहे.
