शासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याच्या आश्वासनावर सोडले उपोषण…
समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी शासनाकडून संपादित शेत जमिनीला प्रति एकर १ कोटी ३० लाख रुपयांची नुकसान भरपाई, पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी व पीडित शेतकऱ्याला प्रतिमाह ३० हजार रुपये पेन्शन आधी प्रमुख मागण्यांना घेऊन समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला विरोध करीत आमरण उपोषण सुरू केले होते.या प्रकरणी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.हे उपोषण मागील २ मार्च रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील क-हांडला येथील भानारकर नामक व्यक्तीच्या निवासी घर परिसरातील शेतामध्ये सुरू करण्यात आले होते.शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती अंतर्गत आयोजित या आंदोलनकर्त्यांनी मागील काही महिन्यांपासून मागण्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवोदन पाठविले होते.
मात्र मुख्यमंत्र्यांकडून निवेदनांना दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप लावण्यात आला आहे तथापि महामार्गाच्या बांधकामा अंतर्गत शेतकऱ्यांशी पर्याप्त चर्चा न करता शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू करण्याचा आरोप करण्यात आला होता.या कारवाईने संतापलेल्या शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक जमिनीचे प्रति एकर १ कोटी ३० लाख रुपये नुकसान भरपाई, पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी व पिडीत शेतकऱ्यांना प्रतिमाह ३० हजार रुपये पेन्शन आदी मागण्यांना घेऊन या मार्गाच्या बांधकामाला विरोध दर्शविला होता. त्याअंतर्गत पिडीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषणही सुरू केले होते.आता अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांना शासनाकडून आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले.त्या आधारावर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी लिंबू पाणी पाजून आंदोलन मागे घेण्यात आले.
