भंडारा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील काही रस्त्यावर गरज नसताना जनतेची मागणी नसताना दोन दोन फूट उंच सिमेंट रस्त्याचे काम मागील आठ महिने अगोदर पासून सुरुवात केली. चार महिने काम केल्यानंतर ही रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत सोडून कंत्राटदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी संगमताने काम बंद केल्यामुळे शहरातील आणि शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना नागरिकांना याच्या प्रचंड त्रास होत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाला अनेकदा निवेदने देऊन सुद्धा यावर कुठलीही कार्यवाही प्रशासनातर्फे होत नव्हती त्याच्या निषेध म्हणून शिवसेना तर्फे भंडारा शहरातील राजीव गांधी चौकाकडे जाणारा रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3