संततधार पावसाने भंडारा वैनगंगा कारधानदी पुरावरील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त दुचाकी ने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे. तर कार्यालयीन कामानिमित्त भंडारा येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तर अक्षरशः पुलावरील पाणी उडाल्यामुळे आंघोळ झाल्याचा अनुभव येत आहे तर पुलावरच पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली असून पुलावरील खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे अनेक खड्डे कुठे आहेत त्याचा नागरिकांना अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी स्लीप होण्याची दाट शक्यता आहे. तर पुलावरून रोजच मोठी वर्दळ असते मात्र पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने संततधार दिवसभर पडलेल्या पावसामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन पुलाचे जलाशय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
