वैनगंगा नाडीपुलावरील 95 वर्ष जुना असणाऱ्या पुलावरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना आवागमन करण्यासाठी वैनगंगा नदी तीरावर मोठा पूल मागील 25 वर्षांपासून बांधलेला आहे असून या पुलावरून मोठ्या प्रमाणात दररोज हजारो लोक वाहतूक करीत असतात मात्र याच नवीन वैनगंगा पुलावर मध्यभागी असलेल्या एक्सपान्शन जॉइण्ड हा जळवाहनासाठी धोकादायक असून वाहने आवागमन करीत असतांना अक्षरशः मोठ्या प्रमाणात आवाज करीत असतो यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला आलेला आहे.तर एक्सपान्शन जॉइण्ड हा वारंवार दुरुस्त करण्यात येते तरी सुद्धा जैसी थे अवस्था होत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून नवीन वैनगंगा नदीपुलावरील एक्सपान्शन जॉइण्ड कायमस्वरूपी दुरुस्त करावी अशी मागणी नागरिक करीत असून याकडे लक्ष दिले नाही तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून दुर्घटना घडली असतांना हीच पुनरावृत्ती होऊ नये हे मात्र विशेष..!
