रात्र उशिरा पर्यंत डॉक्टरला निलंबित केल्यानंतर महिलेचा मृतदेह उचलून केला अंत्यसंस्कार…..
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बुजरूक येथील मृतक महीला मेघा बनारसे या महिलेने सरांडी बुजरूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन कॅम्प लागल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रिया केल्यापासून महिलेला पोटात त्रास सुरू झाला होता. त्रास होताच दोन महिन्यापासून खाजगी, रूग्णालयात उपचार घेतले मात्र तरी पण प्रकृती सुधारणा होत नव्हती व रुग्णालयाचे पैसे देण्यासाठी जवळ पैसा नसल्यानें या महिलेला नागपुर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. अखेर महिलेचा मृत्यू झाल्याने. नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह गावात आणत काल दुपारी तिन वाजेपासून मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केलं.
दोषी डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली होती. रात्र होऊन देखील तोडगा निघाला नसल्यानें गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावरच ठेवून आंदोलन सुरू ठेवलं होत. गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. अखेर खासदार प्रशांत पडोळे, पोलीस अधिक्षक देखील घटनास्थळी पोहचले होते. शेवटी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर ठाकरे यांना निलंबित केल्यानंतर महिलेचा मृतदेह उचलून रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
