भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मेंढा/भुगांव येथील अल्पवयीन मुलाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना झरप शेतशिवरात घडली.योगेश विजय दोनोडे (वय १७ वर्षे, रा. मेंढा /भुगांव) असे मृतक युवकाचे नाव आहे.घटनेच्या दिवशी मृतक योगेश हा स्वतःच्या शेतात धान पिकाची रोवणी सुरु असल्याने आई व इतर मजुरांसह रोवणी करीत असताना शेतातील धुऱ्यावरील मोटार पंपाचा इलेक्ट्रिक वायर हाताने बाजूला करते वेळी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने चिखलाच्या बांधीत पडून जागीच मृत झाला.याप्रकरणी पालांदूर पोलिसांना घटनेची महिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले आहे.गावात शोककळा पसरली आहे.
