शेजार धर्माला काळिमा फासणारी संतापजनक घटना भंडारा शहरातील एका सोसायटीत घडली असतांना एका नामांकित वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका ११ वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला अटक केली.विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो पेशाने वकील आहे.
पीडितेच्या आईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्या वकिला विरोधात भंडाऱ्यातील नागरिकांनी काळ्या फीत बांधून निषेध आंदोलन केले आहे.
