लाखो खर्चूनही वर्षभरातच मैदान झाले चिखलमय,शारीरिक सराव करणाऱ्या तरुणाची हेळसांड….वन्य प्राण्यांचा सामना करत करावा लागतो सराव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून मैदान सपाटीकरणाचे काम केले मात्र कंत्राटदाराकडून निकृष्टदर्जाचे काम केल्याने ते मैदान चिखलमय झाले आहे. राज्य शासन लवकरच राज्यात पोलीस भरती करणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे भरतीच्या आशेवर असलेल्या तरुणाच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत.मात्र गावात शारीरिक सराव करण्याचे मैदान लाखो खर्च करून चिखलमयझाले आहे.तर गावात दुसरे मैदान नसल्याने गावातील तरुणांना गावालगत असलेल्या जंगलात जाऊन शारीरिक सराव करावा लागतो परिणामी वन्यप्रांकडून हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करावी व स्पर्धा परीक्षा सराव करणाऱ्या तरुणांना मैदान दुरुस्ती करून द्यावी ही मागणी स्थानिक विद्यार्थीकडून होत आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें