लाखांदूर येथे शिव भक्तांवर मधमाश्यांचा हल्ला…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भाविकांनी जीव मुठीत धरुन काढला पळ…दहा पेक्षा अधिक भाविक जखमी….

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथिल चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरातील मधमाशांच्या पोळ्याला धूप अगरबत्तीचा धूर लागल्याने उडालेल्या मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने काही काळ शिवभक्तांमध्ये पळापळी झाली तर यात जवळपास दहापेक्षा अधिक शिवभक्तांना मधमाशांनी जखमी केल्याची माहिती असून जखमींना लाखांदूर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

आज महाशिवरात्री निमित्त लाखांदूर येथील चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासूनच येथील महादेव मंदिरात शिवभक्तांनी पूजा अर्चाना करण्यासाठी गर्दी केली होती.
मात्र महादेव मंदिरात आग्या जातीचे मधमाशांचा पोळा आहे.आज सकाळपासूनच शिवभक्तांनी मंदिरात पूजाअर्चा करताना अगरबत्ती पेटवली आणि त्याचा धुर मधमाशांच्या पुळका पर्यंत पोहोचल्याने मधमाशा उडाल्या. मधमाशा सैरावैरा पळत असताना अनेक शिवभक्तांचा चावा घेतला आहे मधमाशा उडाल्याची माहिती मिळतात जमलेले शिवभक्त जिकडे तिकडे पडू लागले यात मधमाशांनी चावा घेतल्याने जवळपास दहापेक्षा जास्त शिवभक्त जखमी झाले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका बोलवून त्यात उपचारासाठी जखमी शिवभक्तांना हलविण्यात आले लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जखमिंवर उपचार सुरू केल्याचे दिसत आहे.दरम्यान लाखांदूर पोलिसांनी चुलबंद नदी तीरावरील महादेव मंदिरातील मुख्य मूर्तीजवळ शिवभक्तांना पूजा अर्चा करण्यास मज्जाव केला असून शिवभक्तांना आता मंदिराच्या बाजू असलेल्या मूर्तींची पूजा करण्याची मुभा दिली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें