लाखांदूर तालुक्यात अस्वलचा धुमाकूळ…दिवसाढवळ्या नागरिकांना अस्वलाचे दर्शन…परिसरात भीतीचे वातावरण…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेतशिवारात तसेच नागरी वस्तीत गेल्या आठ दिवसापासून अस्वलीचा धुमाकूळ बघायला मिळत आहे.आज सावरगाव या गावाजवळ परत एकदा एका अस्वलीचे दर्शन झाले आहे.ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे.लाखांदूर पवनी मार्गावरील सावरगाव फाटा जवळ सदर अस्वलीचाच मुक्त संचार सुरू होते.आज पावसाची रिमझिम सुरू असताना अस्वल शेत शिवारात भटकत होती सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली यावेळी लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी चन्ने यांच्या मार्गदर्शनात सदर अस्वलीला तिच्या अधिवासात सोडण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांना अस्वलीला बघण्याकरिता एकच गर्दी केली होती.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें