भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरामध्ये ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब च्या माध्यमातून पर्यावरण पुरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी बसस्थानक परिसरात निसर्ग वाचविण्याचे संदेश देत रांगोळी काढल्या तर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यावर रांगोळी चित्र काढत पर्यावन समतोल ठेवण्याचे संदेश दिले.तर काही विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी पर्यावरणात विघटन होणाऱ्या वस्तूपासून आकाश कंदील तयार केले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प घेतला व नागरिकांमध्ये जनजागृती केली .
Author: vbn newsnetwork
Post Views: 96








