भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील नगरपंचायत मधील घनकचरा कामगारांनी दोन महिन्याच्या पगारासहीत विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.आंदोलनास तीन दिवस उलटूनही कुठलीच मागणी पूर्ण झाली नसल्याने तिसऱ्या दिवशी भीक मागो आंदोलन करण्यात आले. कामगारांनी मोहाडी शहरामध्ये मोर्चा काढीत मोहाडी नगरवासियांकडे भीक मागितली.यावेळी कामगारांनी होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला.

Author: vbn newsnetwork
Post Views: 33