भंडारा जवळील भिलेवाडा नवीन बायपास महामार्गावर साकोलीच्या दिशेने जाणारी मोटारसायकल अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर आदळली.त्यात मोटारसायकलस्वार जखमी झाला.चंद्रशेखर दिगुलाल बोपचे (३०) रा. खांबा/जांभळी, असे जखमीचे नाव आहे.साकोली तालुक्यातील खांबा/जांभळी येथील चंद्रशेखर बोपचे हा घटनेच्यावेळी मोटारसायकल क्र. एमएच ४० क्यू ७८५३ या गाडीने नागपूरकडून स्वगावाकडे जाण्यास निघाला.कारधा गावाजवळ नवीन बायपास महामार्गावर एका ढाब्यासमोर त्याचे मोटारसायकलवरील ताबा सुटला. अनियंत्रित मोटारसायकल रस्ता दुभाजकावर आदळली.त्यात तो गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका चालक यांना माहित होताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.त्यांनतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे
