भंडारा तालुक्यातील माटोरा गावातील नागरिकांनी गावातील चौकात महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध दर्शविला.तसेच वाढीव वीज बिलांविरोधात जाहीर निषेध व्यक्त करीत वीज बिल जाळण्यात आले. माटोरा गावातील नागरिकांना महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटरमुळे व वाढीव वीज बिलांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या अन्यायकारक वीज बिलांच्या विरोधात ग्रामवासी यांनी एकत्र येऊन वीज बिलाची प्रत जाळून महावितरण कंपनीचा जाहीर निषेध केला.यावर कारवाई होणार काय? असाही सूर व्यक्त करण्यात आला महावितरणने नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.अन्यथा पुढील काही दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 18