आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहषराम कोरोटे २१ फेब्रुवारीला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात करणार प्रवेश करणार आहे . देवरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार सहषराम कोरोटे यांनी पत्र परिषदेत दिली आहे यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू ,मुकेश शिवहरे ,युवा नेते डॉ सुगत चंद्रिकापुरे हे उपस्थित होते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सहषराम कोरोटे यांची तिकीट काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कपात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दिली असता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला असता एन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापली गेल्याने सहषराम कोरोटे यांनी पक्ष श्रेष्टी कडे नाराजी व्यक्त केली आणि तिकीट वाटपात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी घोळ केल्यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाची सरकार येऊ शकली नसल्याचा आरोप माजी आमदार सहषराम कोरोटे यांनी केला असून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीयावर विश्वस्वा व्यक्त करीत येत्या २१ फेब्रीवरील एकनाथ शिंदे यांच्या शिव सेना गटात देवरी येथे आयोजित कार्यक्रमात शिव सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सहषराम कोरोटे यांनी दिली आहे.
तर ९ फेब्रुवारीला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आपल्या मुलाशह प्रवेश केला होता तर येत्या काडात गोंदिया विधान सभेचे माजी आमदार आणि एक माजी खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिव सेना गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली आहे .त्यामुळे येत्या काळात नाना पटोले याना गोंदिया जिल्यात मोठा धक्का बसणार आहे
