माजी आमदारांच्या खंदे समर्थकाचा राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात पक्षप्रवेश…… राजकीय समीकरणं प्रभावित….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चरण वाघमारे यांचे ते खंदे समर्थक असून त्यांचा पक्षप्रवेश तालुक्यात राष्ट्रवादीच्या एका गटाला बळ देणारा ठरला आहे. या घटनेमुळे शरद पवार राष्ट्रवादी व जिल्हाध्यक्ष वाघमारे यांना मोठा धक्का बसला आहे. वाघमारे यांचा उजवा हात म्हणून रहांगडाले यांची ओळख होती. पक्षप्रवेशावेळी आमदार राजू कारेमोरे आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें