महिला मजुरांना घेऊन जाणारी वाहन झाडावर आधळल्याने….२१ महिला जखमी….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रोवणी कामासाठी एकोडी किन्ही गावावरून लाखनी कडे महिला मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली असून यात २१ महिला मजूर जखमी आहेत.ही घटना सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मासलमेटा लाखोरी वळणावर घडली. जखमी झालेल्या महिला मजुरांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत.सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. तर गंभीर जखमी ना भंडारा सामान्य रुग्णालययात भरती करण्यात आले. तर वळणावर एका बालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाने झाडावर आधळल्याचे सांगण्यात येत आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें