महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधणार जनतेसोबत जनसंवाद शनिवारी जिल्हा दौरा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे  शनिवार दि.26 रोजी भंडारा जिल्हा दौ-यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे..

 या दौ-यात महसूलमंत्री नागरिकांसोबत त्यांच्या विविध प्रश्न,समस्यावर जनसंवाद करतील.दौऱ्यातील कार्यक्रमानुसार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल,त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता  उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या कामाचा आढावा,दुपारी 1.30 वाजता जिल्हयातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा होईल,त्यानंतर भुमी अभिलेख विभागाचा आढावा होईल,दुपारी 3 वाजता स्थानिक आमदार महोदयांसोबत बैठक त्यानंतर  दुपारी 4 वाजता नियोजन सभागृहात  पत्रकार परिषद व त्यानंतर 5 वाजता त्याचस्थळी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके यांनी कळवले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें