जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व चाईल्ड हेल्पलाईन कडून खातरजमा करून काजिल्हा बाल संरक्षण अधिकारी व चाईल्ड हेल्पलाईन कडून खातरजमा करून कारवाई प्रकरण्यात केला गुन्हा दाखल..
तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात 17 वर्ष 10 महिने अल्पवयीन मुलीचे एका आंतरराज्यीय मुलासोबत विवाह लावून दिले मात्र याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला टोल फ्री क्रमांक 1098 वर मिळाली.जिल्हा व महिला बालविकास विभाग भंडारा व चाइल्ड लाइन भंडारा यांच्या संयुक्त पथकाने फिल्मीस्टाइलने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत खातरजमा करून हे विवाह 25 एप्रिल ला पार पाडण्यात आले असल्याचे लक्षात आले प्रकरणाची चौकशी केली असता अल्पवयीन मुलीचे वय कमी असल्याने ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमान्वय चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर अशाप्रकारचे कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,अशी तंबी कुटुंबीयांसोबत गावकऱ्यांना देण्यात आली आह ‘नये है पंख अभि.., मुझें आसमान में उडने दो..! विवाह किसे कहते है माँ.., मेरा बालविवाह मत होने दो..!!’ अशी अल्पवयीन बालिकेची भावना असली तरी प्रत्यक्षात मात्र जुन्या रुढी-परंपरेमुळे व कुटुंबीयांच्या अशिक्षितपणामुळे बालविवाह होण्याचे प्रकार घडून येत येतात मात्र जिल्ह्यात सजग असलेल्या जिल्हा व महिला बालविकास विभाग व चाइल्ड हेल्पलाइन,भंडारा यांच्या नजरेतून बालविवाह लावणे शक्य नाही. असाच एक प्रकार तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात उघडकीस आला.चाइल्ड हेल्पलाइन भंडारा 1098 टोल फ्री क्रमांकावर एक कॉल आला.आलेल्या कॉलच्या आधारे पळताळणी करून माहिती पक्की असल्याची खातरजमा करण्यात आली यावरून तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावांत 17 वर्ष 10 महिने अल्पवयीन मुलीचे लग्न 25 एप्रिल ला लावून दिले मात्र सजग नागरिकांनी याची माहिती चाईल्ड हेल्फलाईन देण्यात आली असून जिल्हा महिला व बालविकास विभाग,चाइल्ड लाइन, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने खातरजमा करण्यात आली व अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बालविवाह झाल्याचे लक्षात आल्या नंतर ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असले तरी मा.जिल्हाधिकारी भंडारा यांचे आदेश असतांना गावातील सरपंच,पोलिस पाटील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर हे बालविवाह प्रतिबंधक कमिटीचे सदस्य असून सुद्धा गावातील विवाह का लक्षात आलं नाही हे मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे विशेष म्हणजे जिल्हातील ग्रामसेवक हे बाल विवाह प्रतिबंध अधिकारी असून सुद्धा या सारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे हे मात्र विशेष….









