भंडारा जिल्हातील साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे मागील 16 वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा शेती सुरु केली असून आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. त्यात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. परिणय फुके यांनी भेल चा गेट सुरु करून जोपर्यंत कारखाना सुरु होत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या जमिनीवर शेती करणारच, असा ठाम निर्णय घेतला. असे असताना भेल कडून 16 शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आले आहे. तर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जात असल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोबत 10 हजार दंड थोटवण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना तसही उपासमारीची वेळ आली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना “मरुही देत नाही आणि जगू देत नाही’ असा प्रश्न शेतकरी सरकार ला करत आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 30