भाजपा मध्ये महिलांची गडचेपी होत असल्याने भाजपला ठोकला रामराम….शिवसेना शिंदे गटाला मिळणार उभारी…
आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे सत्र सुरू आहे. अश्यातच भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्वामध्ये आज शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे… भाजपा मध्ये महिलांची गडचेपी होत आहे. महिलांनी पक्षासाठी काम केलं तरी डावाला जात आहे. महिलांना पाहिजे तसे पद दिले जात आहे. त्यामुळे आज शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.. तुमसर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.. भूरे यांनी पक्षप्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गट आणखी बळकट झाल्याचे चित्र दिसून येणार आहे. तर भाजप महिला आघाडी मध्ये नाराजी सूर उमटत असला तरी भाजप महिला आता बॅकफूटवर आल्याचे बोलले जात आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 87








