भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आशू गोंडाणे यांची वर्णी……दोन वर्षांतच जिल्हा संघटनेत झाले फेरबदल…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भाजपच्या प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या यादीत भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आशू गोंडाणे यांचे नाव जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, या यादीतील गोंडाणे हे कमी वयाचे जिल्हाध्यक्ष ठरले आहेत. भाजपमधील अंतर्गत राजकीय फेरबदलात भंडारा जिल्ह्यात अवघ्या दोन वर्षातच जिल्हा संघटनेत फेरबदल झाले आहेत. प्रकाश बाळबुधे यांची दोन वर्षापूर्वीच भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. अलीकडेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूकही झाली. सध्या जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना पक्ष नेतृत्वाने संघटनेत फेरबदल केल्याचे दिसत आहे. आशू गोंडाणे मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असून, मागील टर्ममध्ये ते भंडारा नगरपालिकेचे उपाध्यक्षही राहिले होते.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें