भरधाव ट्रेलरने तरुणास चिरडले….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आ.भोंडेकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोखो आंदोलन…. आर्थिक मदत मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका

भंडारा पवनी मार्गावरील पालगाव येथे भरधाव ट्रेलरने तरुणास चिरडून ठार केले. अनियंत्रित ट्रेलरने विद्युत खांबाला धडक देऊन गावात शिरला. यात ट्रेलर चालक जखमी झाला. सुशांत गणवीर (२८) रा.पालगाव असे अपघातात मृतक झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक याचे दिड महिन्याअगोदर लग्न झाले होते. त्याच्या घरी कमावता व्यक्ती कोणीच नाही त्याच्या मागे आई, व पत्नी असून त्यांचा आधार हरपला आहे. घराचा कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर ट्रक मालक मदत देण्यास नकार दिल्याचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गावकऱ्यांसह भंडारा पवनी महामार्ग रोखून धरला आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका आमदारांनी घेतली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें