भंडारा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार भंडाऱ्यात 31 ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाज प्रबोधन, विविध शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी 10 वाजता भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रम झाला. अध्यक्ष म्हणून चंद्रलालजी मेश्राम (माजी न्यायाधीश व माजी सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग), उद्घाटक म्हणून सुभाष बारसे (पोलीस निरीक्षक, भंडारा) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अविनाश नान्हे (एमबीबीएस, एमडी) उपस्थित होते.सहायक संचालक डॉ. सचिन मडावी व बहुजन कल्याण अधिकारी कुमारी दिपाली निंबाळकर यांनी समाजातील सर्व योजनांचा लाभ तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमात समाजातील कार्यकर्त्यांचा सत्कार, मुलांना प्रमाणपत्र वितरण तसेच सांस्कृतिक कलापथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.विविध समाजसंघटना, शासकीय विभाग व संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला
