शेतीमधील वाढत्या आव्हानांमुळे शेतकरी आता पारंपरिक पद्धतीऐवजी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने धान पिकाची कापणी करीत आहेत. मजूरटंचाईमुळे धान कापणीचे काम वेळेत पूर्ण करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत यांत्रिक कापणीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. भंडारा जिल्हातील लाखनी तालुक्यातील शेतकरी आता हार्वेस्टर आणि इतर अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून कमी वेळेत आणि कमी खर्चात कापणी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचत असून, उत्पादन खर्चातही बचत होत आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 32









