राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भंडारा जिल्हा दौरा दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दरम्यान शाल श्रीफळ देऊन चाकणकर यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिलांची स्फूर्ती वाढवण्याकरिता लाडल्या बहिणींशी संवाद साधत मार्गदर्शनही केले. मार्गदर्शन करताना महिलांना अडीअडचणीच्या वेळी लाडक्या भावाने दिलेले दीड हजार कामात येतात. आणि म्हणून ते दीड हजार रुपये महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. मात्र विरोधक अजूनही ती योजना बंद व्हावी यासाठी लागलेले आहेत आणि विविध प्रयत्न करत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी विरोधकांवर केली आहे.
