भंडाऱ्यात बियरबार चालकांच्या समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा….जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बियर बार चालकांच्या विविध अडचणींना घेऊन भंडारा जिल्हा बार असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शासनाच्या वतीने दारू विक्रेत्यांवर (बियर बार चालकांवर) मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला असून त्यामुळे बियर बार चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे. व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने बार चालकांवर संकट ओढवले असून या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. 

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें