भंडाऱ्यात बालकाची 70 हजार रुपयांत विक्री…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अवैध दत्तक प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल…बालक बाल कल्याण समितीच्या ताब्यात…

चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार,एका बालकाची 70,000 रुपयांत विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून सदर प्रकरणाची दखल घेत,भंडारा येथील चाईल्ड हेल्पलाईन कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता,संबंधित बालकास दत्तक दिल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये जन्मलेल्या बालकास फक्त 15 दिवसांचा असताना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तक लेख तयार करण्यात आला.दत्तक घेणाऱ्या व्यक्तींनी खोटे दस्तऐवज तयार करून बालकाची प्रसूती भंडारा येथील खाजगी रुग्णालयात झाल्याचे भासवले.त्या आधारे भंडारा नगर परिषद येथून नविन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेसाठी न्यायालयीन आदेश न घेता,आपसी तडजोडीने व अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली.या प्रकरणात सात आरोपींविरुद्ध साकोली पोलिस ठाण्यात जे. जे. अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आणि बालकास बाल समितीच्या ताब्यात घेतले असून जे. जे. अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार कठोर कायद्या अंतर्गत आरोपीला अटक करणे आवश्यक असले तरी अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही हे मात्र विशेष..!

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें