बैठकीदरम्यान अनेकांनी घेतला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश…..पक्षप्रवेशाने आगामी निवडणुकांमध्ये समीकरणात बदलणार…..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक भंडाऱ्यातील हॉटेल व्ही.के. येथे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमावेळी शहरातील असंख्य राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांतील पक्षाच्या तयारीवरही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 9