भंडारा शहराजवळच्या गणेशपुरे येथे गणपती दर्शनासाठी आलेल्या एका दांपत्याच्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली.या अपघातात दुचाकी चालकाचा ट्रकच्या खाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून मृतकाला रक्ताच्या थारोळ्यात बघून नातलगांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर गहिवरून गेला.अपघातानंतर ट्रकचालकाला संतप्त नागरिकांनी चांगला चोप दिला.काल रात्री दहा वाजताच्या सुमारास भंडाऱ्यातील साई मंदिरच्या समोर हा भीषण अपघात घडला.अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने राजीव गांधी चौक दिशेने त्याच्या जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.त्यामुळे दुचाकी चालक ट्रकच्या चाकाखाली आला तर त्याची पत्नी दुसऱ्या बाजूला पडली. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या या युवकाचा काळाच्या रूपात आलेल्या ट्रकने घात केला.जगदीश महादेव चकोले असे मृतकाचे नाव असून ते मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत.









