भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी उत्साहात संदल काढत गाजत-वाजत रॅली काढून उर्स साजरा केला. ढोल-ताशांच्या निनादात व आकर्षक सजावटीसह निघालेल्या या मिरवणुकीत युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक वातावरणात काढलेल्या या रॅलीत एकोपा व भाईचाऱ्याचे दर्शन घडले. उर्स निमित्ताने विविध ठिकाणी फुलांनी सजविलेले संदल मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या सहभागामुळे परिसरात जल्लोषमय वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धा, उत्साह व सामुदायिक सलोखा यांचा सुंदर मिलाफ घडवणारा हा सोहळा भंडाऱ्यात अविस्मरणीय ठरला.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2