प्रकाशमय पर्व दिवाळीचे अवचित्य साधत भंडाऱ्यातील खांबतलाव येथे 51 हजार दिवे लावण्याचा संकल्प आ.नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला असून आज या भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रभू श्रीराम उत्सव व खांबतलाव पुनर्विकास समिति द्वारे आयोजित या दीपोत्सवाचे उद्घाटन आम.नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे आयोजन आज सायंकाळी खांबतलाव येथील प्रभू श्री राम प्रतिमा परिसरात करण्यात येणार आहे.समाजात एकोपा आणि शांती निर्माण व्हावी या हेतूने प्रभू श्री राम उत्सव व खांबतलाव पुनर्विकास समिति द्वारा मागील वर्षी सुद्धा 21 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता आणि यात शहरातील अनेत नागरिकांनी सहभाग दिला.या वर्षी हा दीपोत्सव 51 हजार दिव्यांसह आयोजित केला असून यात भंडारा शहरातील 100 पेक्षा अधिक मंदिराचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.









