भंडाऱ्याच्या वरठी येथील मुख्य आंबेडकर चौकातील मार्गावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार दुकानांचे कुलूप तोडून अंदाजे १० ते २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही दुकानांमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाली असूनही चोरटे अद्याप मोकाट असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला व वरठी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती….. अखेर डॉग स्कॉट बोलवून तपास सुरू करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत…..

Author: vbn newsnetwork
Post Views: 3