भंडारा जिल्ह्यातील पो. स्टे. लाखांदूर हद्दीतील शिवमंदीर समोर लाखांदूर येथे अवैध देशी दारू वाहतुकीबाबत स्था.गु.शा., भंडारा येथील उपविभाग- पवनी पथकाने रेड केली असता आरोपी नामे- सोनम उर्फ सोनू देवाजी शहारे, वय 24 वर्ष, रा. चप्राड, ता. लाखांदूर याचे ताब्यातून 90 ML चे एकूण 300 नग देशी दारूचे बॉटल कि. 10,500/- रु. व एक हिरो कंपनीची मोपेड क्र. MH-36/AN-8626 किं. 60,000/- रु. एकूण किं. 70,500/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पो. स्टे. लाखांदूर अप. क्र. 185/2025 कलम 65 (अ) महा.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 15