भंडाऱ्याच्या मोहाडीत नगरपरिषदेच्या अनधिकृत कचरा संकलन केंद्राने वाढला आरोग्याचा धोका……दुर्गंधीने परिसरातील स्थानिक हैराण…. नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाची दुर्लक्ष….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे नगरपरिषदेकडून शहराच्या मध्यवर्ती भागात, राष्ट्रीय महामार्गालगत, अनधिकृत डंपिंग यार्ड तयार करून अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो. कचरा व्यवस्थापनासाठी अधिकृत जागा वेगळी असतानाही शहरातील संपूर्ण कचरा या ठिकाणीच साचवला जातो. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून फक्त ५० मीटर अंतरावर शाळा व नागरिकांची घरे असल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा धोका तातडीने थांबवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें