ठक्कर बाप्या विकासनिधीच्या गैरवापर प्रकरणी चौकशी करण्याची मागणी……
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या चिखला येथे आदिवासी समाजाच्या विकासाकरिता ठक्कर बाप्या योजनेचा निधी वापरण्यात आला. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून याप्रकरणी चौकशीच्या करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने कोणती कारवाई न केल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी चिखला येथील ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत या प्रकारची चौकशी होऊन दोषीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका आंदोलन करत्यांनी घेतली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 4