भंडाऱ्याच्या खापा येथील एका बारदाना केंद्राला अचानक आग लागली. या आगीत केंद्रातील शेकडो बारदाने जळून खाक झाले, तर सुरक्षित ठेवलेला मोठा साठा वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, खापा येथील व्यापारी संजय जैन यांच्या मालकीच्या या बारदाना केंद्रात ही घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्याच वेळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सुदैवाने आगीचा भडका जास्त मोठा नसल्याने केंद्रातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ केलेल्या उपाययोजनांमुळे आग नियंत्रणात आणता आली.

Author: vbn newsnetwork
Post Views: 20