भंडाऱ्याच्या खांब तलाव चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे साम्राज्य…..प्रवाशांचे हाल….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील खातरोड थांब तलाव चौक परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांचे हाल होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दुचाकीस्वारांसह वाहनधारकांना अक्षरशः चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. पाणथळ भागामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही उपाययोजना न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा नगरपरिषदेच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज आहे…

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें