भंडाऱ्याचा वरठी भागात रेतीची चोरी….. अवैधरित्या विनापास परवाना रेतीची वाहतूक….. १२,१२,०००/- रु चा मुद्देमाल जप्त……

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नदी घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना रेती चोरी करणारे 2 ट्रॅक्टर रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना वरठी भागातील जमनी शिवारात घडली. या घटनेत पो. स्टे. वरठी हद्दीत (1) स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा टॅक्टर आणि ट्राली चा चालक रवींद्र दिलीप व्यवहारे, वय ३७ वर्ष, रा. नवीन टाकली, भंडारा (2) ट्रॅक्टर क्र. MH-36/L-3032 चा चालक निकेश भाऊराव भोयर, वय ३० वर्ष, रा. टाकली (पुनर्वसन) यांच्या विरोधात वरठी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत वरठी पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर व प्रत्येक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये असलेली एक एक ब्रास रेती असा एकुण 12 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक/मालकां विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३(२), सह कलम ७,९ पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें