भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात नामांकित दुकाने असूनही रस्त्यावर उघड्यावर पडलेला कचरा आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहे. व्यावसायिक परिसराची अशी अवस्था असेल तर निवासी भागाची परिस्थिती अधिकच दयनीय असण्याची शक्यता आहे…. स्वच्छ सर्वेक्षण 2024 च्या सिटी रिपोर्ट कार्डनुसार भंडारा शहर राज्यात 414 पैकी 316 व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातही भंडारा नगर परिषद स्वच्छतेच्या बाबतीत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार केवळ 49 टक्के घरांमधूनच कचरा संकलन केले जाते. अशा परिस्थितीत उर्वरित घरांचा कचरा कुठे जातो, हा प्रश्न निर्माण होतो. दरवर्षी नगरपरिषद आरोग्य विभागाकडून लाखो-कोटींची कंत्राटे काढली जातात मात्र स्वच्छतेची स्थिती सुधारत नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाची उदासीनता उघड होत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 13