परवानगी न घेता गगनचुंबी इमारती उभ्या…. अनेक इमारतीत फायर सेफ्टी परवानगी नाहीं…. सिंग टॉवर इमारतीला आग लागून सात दिवस लोटून गेल्यावर देखील साधा पंचनामा केला नाही….. अधिकाऱ्यांची अनाधिकृत इमारतीला मुक संमती..
भंडारा शहरात फायर सेफ्टी परवानगी न घेता अनेक इमारती उभ्या आहेत… नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या अनधिकृत इमारतीवर करवाई करणारं तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
.
भंडारा शहरात अनेक इमारती परवानगी न घेता पाच, सहा मंजली उभ्या आहेत. कुठलीही परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम करण्यात आला आहे. तर काही इमारतीत फायर सेफ्टी परवानगी देखील घेण्यात आली नाही. तरी पण बिल्डर बिनधास्त पणें गगचुंबी इमारती तयार करत आहे. शहरातील सिंग टॉवर इमारतीला 14 जानेवारीला आग लागली. या इमारतीत कुठलीही फायर सेफ्टी नव्हती सुदैवाने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अग्नी शमन गाडी वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. सात दिवस लोटून देखील नगर परिषदेकडून इमारतीचा साधा पंचनामा देखील करण्यात आला नाही. मध्यम प्रतिनिधि यांनी हा प्रश्न विचारल्यावर नगर परिषद प्रशासन झोपेतून जागं झालं. आता सिंग टॉवर मालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सांगीतले. पण आता पर्यंत का कारवाई करण्यात आली नाही हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. तर शहरात अनाधिकृत इमारतीचा बोलबाला असुन नगर परिषद विभागाची मूकसंमती या इमारतीला असल्याचं दिसुन येत आहे.
