परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदल करता येणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा…
भंडारा जिल्ह्यात नागरिकांच्या कोणत्याही परवानगीशिवाय सर्रास बदल करीत असल्याने या मीटर जबरदस्तीने बदल केल्याने अनेक नागरिकात मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ३१ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ ला उपोषणाला बसले होते. यात विद्युत विभागाकडून देण्यात आलेले आश्वासन हे फोल ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व पदाधिकारी हे आक्रमक झाले.यात त्यांनी यानंतर जर विनापरवानगी कोणत्याही विद्युत ग्राहकाची मीटर बदल झाले तर त्या कंपनीच्या व्यक्तीला बदलून काढण्याचे वॉर्निंग देखील या वेळेस अधीक्षक अभियंता राजेंद्र गिरी यांना दिली.अधीक्षक अभियंता राजेंद्र गिरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाची मागणी रास्त असून ही शासनाने देखील बोलले होते की परवानगीशिवाय कोणत्याही विद्युत ग्राहकांची मीटर बदलता येणार नाही. यापुढे प्रत्येक ग्राहकाला परवानगी दिल्याशिवाय मीटर बदलू देणार नाही असे आश्वासन दिले गेले आहे.
