पत्रकार दिन कार्यक्रमाप्रसंगी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनसमित्यांची घोषणाभंडारा : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्पे
दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार भवनात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवन महाराष्ट्रात नावारूपास येणार आहे. पत्रकार भवनाच्या इमारतीकरिता जेवढी मदत लागेल ते सर्वतोपरी देण्याचे आश्वासन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने समित्यांची घोषणा करण्यात आली.याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मंचावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, सचिव मिलिंद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटुले, कोषाध्यक्ष डी.एफ. कोचे, वरिष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, हिवराज उके, मो.आबिद सिद्दीकी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भारताच्या आट्यापाट्या संघाचे प्रतिनिधित्व करणार्या प्राची केशव चटप हिचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील एनडीटीव्ही प्रतिनिधी दिवंगत चंद्रहार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.मराठी पत्रकार भवन हे महाराष्ट्रात एकमेव असे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपला सदैव पाठबळ राहणार आहे. यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्यास आपण कटिबध्द आहे. पत्रकार भवन दोन मजली करण्याचा मानस असून झालेल्या ८० टक्के बांधकामामुळे आपण समाधानी असल्याचे मत यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित पत्रकारांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी बदलत्या काळातील तंत्रज्ञान हे पत्रकारांना अवलंबण्याची गरज आहे तरच पत्रकारितेच्या क्षेत्रात पत्रकार टिकेल असे मार्गदर्शन करताना सांगितले.
Mathematics मिळणार्या सुविधांची शासन केवळ घोषणा करते मात्र त्याची पुर्तता होत नसल्याची खंत वरिष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली.यावेळी भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव मिलिंद हळवे, वरिष्ठ पत्रकार हिवराज उके, माजी सचिव मो.आबिद सिद्दीकी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डी.एफ. कोचे यांनी केले तर आभार राकेश चेटुले यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रकांत श्रीकोंडावार, विलास केजरकर, दीपक रोहनकर, सुरेश कोटगले, ललितसिंह बाच्छिल, राजू आगलावे, चंद्रकांत शहारे, देवानंद नंदेश्वर, इंद्रपाल कटकवार, शशिकांत भोयर, समीर नवाज, शेखर बोरकर, अजय मेश्राम, प्रवीण तांडेकर, सरवर शेख, उमेश जांगळे, सचिन मेश्राम, नवीन निश्चल, सैय्यद जाफरी, प्रशांत देसाई, मनोज देशमुख, वामन चांदेवार, येनोरकर, हंसराज रामटेके, नितीन कुथे, सुरेश फुलसुंगे, युवराज गोमासे, अनमोल मेश्राम, घनश्याम खडसे, जयकृष्ण बावणकुळे, सुधीर गोमासे, दिलीप बडोले, यशवंत थोटे, संजीव जयस्वाल, मनोहर मेश्राम, अमित गिर्हेपुंजे, कृष्णा बावनकुळे, सुरेंद्र चिंधालोरे, प्रमोद रणदिवे, शत्रुघ्न भांडारकर, स्वप्नील मेश्राम, अनिल रहांगडाले, सुरज निंबार्ते, नरेश बोंदरे, मुकेश मेश्राम, देवराम फटे, प्रल्हाद हुमने, विरेंद्र गजभिये, संजय भोयर, पृथ्वीराज बन्सोड आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार बंधू उपस्थित होते.
पत्रकार भवनात विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीची गरज : सुनील फुंडेभंडारा शहराच्या मध्यवर्ती भागात भंडारा जिल्हा मराठी पत्रकारसंघाची भव्यदिव्य पत्रकार भवन उदयास येत आहे. जिल्ह्यात एमआयडीसीसारख्या जागा असूनही पाहिजे त्याप्रमाणात उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी फोफावली आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत टिकण्यासाठी सोय नसल्याने असे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी पत्रकारसंघात ई-लायब्ररीची संकल्पना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मांडली. जेणेकरून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच शेतकर्यांनी परंपरागत धान शेती न करता इतर पिकाचे उत्पादन घ्यावे. भंडारा जिल्हा हा भाताच्या जिल्ह्यासोबतच रेतीचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. मात्र जिल्ह्यात घरकुलासाठी महाग दराने रेती घ्यावी लागते. ही एक शोकांतिका असल्याचे मत सुनील फुंडे यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.
