भंडारा जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह बरसला पाऊस……

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. मात्र, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान रोप लहलहून उठले असून पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पावसामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें