भंडारा जिल्ह्यात काल आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक भागांना तडाखा दिला. मोहाडी तालुक्यातील पारडी व मुंढरी परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिक जमीनदोस्त झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभे पीक वाऱ्याने आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या महिन्याभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक हानीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे…

Author: vbn newsnetwork
Post Views: 13