भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततदार सुरू आहे तर या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 ही दरवाजे खुले करण्यात आले असून वैनगंगा नदीची धोका पातळी 245.50 मीटर इतकी आहे. तर आता वैनगंगा नदीच्या पाणी पातळी 244.94 इतकी वाढ झालेली असून वैनगंगा नदी लवकरच आपली इसारा पातळी ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. तर जिल्ह्यातील छोटे नाले हे ओसंडून वाहत असून त्या नाल्यावरून गावकऱ्यांनी येजा करू नये असा इसारा सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 32