भंडारा जिल्ह्यात ‘दिशा प्रकल्प’ मोहीम, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेतुन मिळणार प्रेरणा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘दिशा प्रकल्पा’ने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवा मार्ग दाखवला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश खेड्यापाड्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे आहे. या उपक्रमांतर्गत लाखनी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत समर्थ महाविद्यालयात १०० गुणांची विशेष परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ज्यामधून जिल्ह्यातील ५० होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध पदावर कशी निवड होईल आणि त्यांची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील इतर विद्यार्थांना त्याची मदत होईल त्या करिता हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें