भंडारा जिल्ह्यात आज ठिकठिकाणी लहान-मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडले. विविध गणेश मंडळांनी मिरवणुका काढत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात आणि गावांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क होते. नागरिकांनी देखील शिस्तबद्धतेने सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील विसर्जन कार्य सुरळीत आणि शांततेत पार पडले. संपूर्ण जिल्ह्यात धार्मिक वातावरण आणि भक्तिमय उत्साह दिसून आला.

Author: vbn newsnetwork
Post Views: 13