भंडारा जिल्ह्यातील एकूण १७ पोलिस ठाण्यांपैकी एकाचवेळी १२ पोलिस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले, त्यात कारधा ठाण्याचा समावेश असून पालकमंत्री संजय सावकार यांच्या उपस्थितीत कार्धा पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ पार पडला. दरम्यान पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हा पोलिस दलाने दमदार कामगिरी केली आहे. जिल्हा पोलिस खात्याने ९ महिन्यात वाळू तस्करीला आळा घालीत ७५ कोटींचा दंड वसूल केला. या महसुलातील ५० टक्के हिस्सा पोलिस खात्याला विकासकामे व सुधारणांसाठी दिला जाईल, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसा ठराव घेतला जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना केली.

Author: vbn newsnetwork
Post Views: 16